शैलेश अग्रवाल यांचा परिचय


img

शेतकरी आरक्षण चळवळीचे प्रणेते शैलेश अग्रवाल हे ऊर्ध्व वर्धा, निम्न वर्धा व प्रकल्प ग्रस्तांचे पुनर्वसन अश्या तब्बल तीन प्रकल्पांचे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत. शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा तसेच पशुपालनाचे फायदे व त्यातून मिळणारा नफा शेतकर्‍यांना समजावून सांगण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून गौतीर्थ या प्रकल्पाची स्थापना केली असून त्याठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र, कोंकण व गोवा येथील शेतकरी व पशुपालक मोठ्या प्रमाणात भेटी देत आहेत. शासनाच्या उत्कृष्ट पशुपालक पुरस्काराचे ते मानकरी आहेत. त्यांनी एकच मिशन शेतकरी आरक्षणच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी आश्वस्त दीर्घकालीन विकासात्मक उपाय योजना सुचविल्या व प्रस्तावानुसार अंबलबजावणी करण्याची आग्रही मागणी केली. महाराष्ट्रातील अनेक ग्राम पंचायती, पंचायत समित्या व कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांच्या आरक्षणाच्या प्रस्तावावर ठराव मंजूर करून सदरचे ठराव या मागणीसाठी शासन दरबारी पाठवले आहेत व या शेतकरी आरक्षणाच्या मागणीला बळकटी दिली आहे.


शैलेश अग्रवाल यांनी २००५ ते २०१६ पर्यंत एस एस बी हॉस्पिटल संचालन माध्यमातून वैद्यकिय व्यवसाय केला व १९९९ ते आजपावेतो शेती हा पारंपारिक व्यवसाय करतात. वर्तमान व भावी पिढीला पुन्हा शेतीकडे आकर्षित करायचे व शेतकऱ्यांची अर्थक्रांती घडवण्याचे उद्देश्य ठेवून शैलेश अग्रवाल मागील काही वर्षांपासून पूर्ण वेळ शेती हाच व्यवसाय करतात व विविध माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. शेतकर्‍यांसाठी आरक्षण हीच दीर्घकालीन विकासात्मक उपाययोजना आहे, त्यानुसार मागण्यांसह त्यांनी एकच मिशन शेतकरी आरक्षण संकल्पनेची एप्रिल २०१७ पासून गांधी आश्रम सेवाग्राम येथून सुरुवात केली.


पत्नी - डॉ. मंजूषा शैलेश अग्रवाल या एम.बी.बी.एस. आणि एम.डी. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र आहेत. त्या सध्या वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर मंजुषा सामाजिक व धार्मिक कार्यात पती शैलेश यांच्यासह सक्रिय रित्या सहभागी असतात.